बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या 'कूली नंबर -1 ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान ती वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
सारा आणि वरुण धवन त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. आता सारा अली खाननं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सारा अतिशय ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. सारानं या फोटोमध्ये डेनिम क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
सारा आणि वरुणचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
सारा आणि वरुणचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.