सध्या सोशल मीडियावर प्रत्येक धमाकेदार गोष्ट लवकरच व्हायरल होते. मग एखाद्या व्हिडीओ असो किंवा मालिकेतील पात्र.
'देवमाणूस' या मालिकेतील सरू आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. प्रत्येक पात्राची आपली वेगळी खासियत असते. तशीच सरू आजी तिच्या म्हणींमुळे चांगलीच गाजली आहे.
'देवमाणूस' या मालिकेत अभिनेत्री रुक्मिणी सुतार या सरू आजीच्या भूमिकेत आहेत. रुक्मिणी सुतार यांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक होताना दिसत आहे.
या सरू आजीवर सोशल मीडियावर मीम्ससुद्धा तयार करण्यात आले आहेत.
या मालिकेतील सगळेच पात्र लक्षवेधी ठरले आहेत.