नादखुळा ! डोळ्यावर गॉगल, पायात 8 किलोची नागीण चप्पल, हौसेला मोल नाय आणि साताऱ्याच्या केराप्पांच्या स्टाईलला तोड नाय

| Updated on: Mar 25, 2022 | 11:52 AM

माणसं आपली हौस पुर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात सातारा जिल्ह्यात असेच एक हौशी व्यक्तीमत्व केराप्पा आहे जे चक्क 8 किलोची नागीण चप्पल वापरतात.

1 / 6
हौसेला मोल नाय हे म्हणतात ते काय खोटं नाही.हौशी माणसं आपली हौस पुर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात  सातारा जिल्ह्यात असेच एक हौशी व्यक्तीमत्व केराप्पा आहे जे चक्क 8 किलोची नागीण चप्पल वापरतात.

2 / 6
सातारा जिल्ह्यातील असलेल्या माण तालुक्यातील जांभुळणी गावचे केराप्पा कोकरे हे 60 वर्षांचे गृहस्थ चक्क 8 किलोची चप्पल वापरतात. त्यांची नागीण चप्पल ही संपुर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे.

3 / 6
ग्रामीण भागात राहणाऱ्या केराप्पा यांची वेशभूषा पाहिली तर ते सगळ्यात उठून दिसतात. 8 किलोची नागीण चप्पल  ग्रामीण शैलीतील पोषाख डोक्यावर फेटा डोळ्यावर गॉगल लावला की केराप्पा अगदी साऊथच्या पिक्चर मधले हीरोच दिसतात.

4 / 6
वयाच्या 15 वर्षांपासुन केराप्पा कोकरेंना वजणाने जड चप्पल वापरण्याचं वेड लागलय त्यांनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चप्पल बनवुन त्यांना परिधान सुद्धा केलय. चप्पल बनवण्यासाठी कितीही खर्च आला तरी केराप्पा मागे पुढे पाहत नाहीत आत्ता वापरत असलेली केराप्पांची चप्पल तब्बल 31 हजार रुपयांची आहे.

5 / 6
 या चप्पल ला केराप्पा पोटच्या मुलासारखे जपतात चप्पल ला रोज अत्तर लावुन व्यवस्थित पुसुन ठेवण्याचं काम ते नियमाने करतात. लग्न समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा गजी नृत्यामध्ये केराप्पा ही चप्पल घालुन जातात या ८ किलोच्या चप्पल मुळे केराप्पा यांना सेलिब्रिटी प्रमाणेच वागणुक मिळते.

6 / 6
केराप्पांनी ही चप्पल अकलुज मधुन बनवुन घेतली असुन यासाठी या चप्पल मध्ये 100 एल ई डी लाईट्स ,गोंडे, 100 घुंगरु,  नटबोल्ट, काचेच्या टिकल्या बॅटरी असं सगळं वापरण्यात आलं  आहे.