सातारा-पंढरपूर मार्गावरील एका एसटी बसवर हुल्लडबाजांनी ताबा मिळवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
माळशिरसजवळील पिलीव घाटात ही घटना घडली.
सातारा पंढरपूर एसटीवर सुरुवातीला दगडफेक करण्यात आली.
त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एसटी बस अडवत त्यावर दगडफेक केली.
तसेच एसटीतील प्रवाशांना मारहाण केली.
या दगडफेकीत एसटीचा चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंढरपूरहून साताऱ्याकडे जात असताना या एसटीवर दगडफेक झाली आहे.
त्यामुळे पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.