सातारा : पाटण तालुक्यातील कुठरे गावातील कला शिक्षक दामोदर दीक्षित यांनी लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या पानांवर अनेक व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक व हुबेहूब चित्रे साकारली आहेत.
पिंपळाच्या पानावर चित्रे काढण्यासाठी त्यांनी पिंपळाची मोठी पाने शोधून आणली. त्यानंतर पाने पुस्तकात ठेवून व्यवस्थित सुकवली.
त्यानंतर वेगवेगळे रंग वापरून पिंपळाच्या पानावर त्यांनी समाजुधारक तसेच देवी-देवतांचे चित्रं रेखाटली आहेत. चित्रातील पात्रे जिवंत वाटावीत अशी ही चित्रे आहेत.
पिंपळाच्या पानावर रेखाटलेली ही चित्रे पाहण्यासाठी विद्यार्थी व कलाप्रेमी वेगवेगळ्या ठिकाणाहून दीक्षित यांच्या घरी येतात.
शाळा-महाविद्यालये, सेवाभवी संस्था, व्यक्ती व मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच या प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थी व नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन देण्याचा दामोदर दीक्षित यांचा संकल्प आहे.