PHOTOS : कोरोनाने धंदा बसला, मिठाई दुकानदाराची शक्कल, चेंबुरमध्ये होळीनिमित्ताने थेट 1 किलोची 2 फूट जिलेबी
कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा मिठाई दुकानात गर्दी कमी आहे. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दुकानदार हैराण आहेत.
-
-
मिठाईला मागणी वाढणार.
-
-
उत्पन्न अर्ध्यापेक्षाही जास्त घटलंय. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
-
-
होळी सणाच्या निमित्ताने स्पेशल मावा चंद्रकला, भूजिया, मलाई घेवर, मावा प्रागरी, मावा समोस्याला लोकांची चांगली पसंती असते.
-
-
म्हणूनच यंदा चेंबूरच्या प्रख्यात झामा आणि सत्तू स्विटमध्ये चक्क 1 किलोची 2 फूट लांब जंबो जिलेबी काढण्यात आली.
-
-
कुणाल जगवानी असं या सत्तू स्विट्सच्या मालकाचं नाव आहे.
-
-
त्यांनी कोरोना काळातही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली आहे.
-
-
विशेष म्हणजे याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं जगवानी यांनी सांगितलंय.