‘कोस्टल रोड’मुळे मुंबईतील महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंडाचे अस्तित्व धोक्यात; रक्षणासाठी पर्यावरण मंत्र्यांना साकडे
राज्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या देवीच्या जागृत मंदिरात देवीची कुंड आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या समुद्रात अशाप्रकारे देवीची कुंड आहे.
-
-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईचे महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंडाचे रक्षण करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश मजगुणकर यांनी केली आहे.
-
-
त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
-
-
राज्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या देवीच्या जागृत मंदिरात देवीची कुंड आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या समुद्रात अशाप्रकारे देवीची कुंड आहे.
-
-
मात्र गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी ते हाजीअलीजवळ कोस्टल रोडचे काम सुरु आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिराच्या समुद्रातील देवीच्या कुंडांची जपणूक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
-
कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकण्यात येत असताना गोड्या पाण्याचे हे दहा झरे (कुंड) नष्ट होऊ शकतात. त्यामुळे देवीच्या कुंडांची जागा सुरक्षित राहावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.