अभिनेत्री सायली संजीव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
आता सायलीनं हटके आणि स्टायलिश अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
हे फोटो आता चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.