Punekar ki jaan aur shaan म्हणत अभिनेता अक्षय कुमारने पुण्यात मिसळीवर मारला ताव
अभिनेता अक्षय कुमार पुण्यात आला होता त्यावेळी अक्षय कुमार चक्क पुणेरी मिसळपाव खाण्याचा आनंद लुटला आहे.यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
1 / 5
अभिनेता अक्षय कुमार पुण्यात आला होता त्यावेळी अक्षय कुमार चक्क पुणेरी मिसळपाव खाण्याचा आनंद लुटला आहे.यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
2 / 5
सोशल मीडियावर लिहिली. मिसळ खातानाचा एक फोटो शेअर करत अक्षय म्हणतो, 'प्रत्येक पुणेकरांचा जीव कि प्राण आणि शान असलेला मिसळ पाव.. अशी मिसळ देऊन आमचं पोट आणि मन तृत्प केल्याबद्दल खूप खूप आभार.. खूप छान.'
3 / 5
अक्षय कुमार गेल्या 30 वर्षांपासून आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या प्रवासात अभिनेत्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही दिले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत.
4 / 5
काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याचा नुकताच आयकर विभागाने देशातील "सर्वात जास्त करदाता" म्हणून गौरव केला. आता बुधवारी ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अक्षय कुमारने सर्वाधिक करदाता बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "मला खूप आनंद झाला आहे. आयकर विभाग प्रत्येक गोष्ट विचारात घेतो आणि लोकांना क्रेडिट देतो हे जाणून खूप आनंद झाला. असे त्याने म्हटले होते.
5 / 5
अक्षयकुमारने वयाचा ५४ वर्षांचा टप्पा गाठला असला तरी आपला व्यायाम , आहार , डाएट यामुळे आजहीअगदी २० तल्या तरुणा इतका फीट असलेला दिसून येतो . मात्र पुण्यात डाएट वैगेरे सर्व बाजूला सारून त्यानं मिसळीवर ताव मारला आहे.