प्रयागराजमध्ये एका श्रद्धाळूने दुर्गा मूर्तीलाच मास्क घातला आहे. यामागे दुर्गा पूजेसाठी येणाऱ्या भक्तांमध्ये कोरोना संसर्गाविषयी जनजागृती व्हावी असा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
देशभरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा मातेची पूजा होत आहे. दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करताना देशभरात विविध सजावट करण्यात आली आहे. त्यावर कोरोना आणि वादळासारख्या संकटांचाही परिणाम दिसत आहे. काही ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीला मास्क घातलेला दिसत आहे, तर कुठं वादळात मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
-
-
कोलकात्यात दुर्गा पूजेआधी दुर्गा मातेची मातीची मूर्ती घेऊन जाताना भक्त.
-
-
कोलकात्यात एका ठिकाणी दुर्गा मातेच्या पूजा मंडपात वादळात प्रभावित झालेल्या सुंदरबन परिसरातील लोकांचे फोटो लावण्यात आले आहे. यातून या सर्वांना आदरांजली वाहण्यात आली.
-
-
कौटुंबिक दुर्गा पूजा उत्सवात घरातील सदस्य पारंपरिक पद्धतीने दुर्गा मातेची पूजा करताना.
-
-
प्रयागराजमध्ये एका श्रद्धाळूने दुर्गा मूर्तीलाच मास्क घातला आहे. यामागे दुर्गा पूजेसाठी येणाऱ्या भक्तांमध्ये कोरोना संसर्गाविषयी जनजागृती व्हावी असा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
-
जयपूरमध्ये दुर्गा पूजा उत्सवाआधी दुर्गा मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना एक मूर्तीकार.
-
-
दुर्गा पूजा उत्सवासाठी दुर्गा मातेची मूर्ती पूजेच्या ठिकाणी घेऊन जाताना भक्त.