वाईल्डलाईफ प्रत्येकाला नेहमीच आकर्षित करते. त्यामुळेच अनेक फोटोग्राफीला प्राण्यांची दुनिया कॅमेऱ्यात टिपण्यासाठी महिनोंमहिने जंगलात घालवतात. अशा फोटोग्राफाली प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईअर अवार्ड्स’ (Wildlife Photographer of the year) जाहीर करते. यंदाही या पुरस्कारासाठी जगभरातील फोटोग्राफर्सने आपले फोटो पाठवले होते. याचा निकाल आता जाहीर झाला आहे.
-
-
वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईअर अवार्ड्स एक ग्लोबल ऑनलाईन फोटोग्राफी कॉम्पिटीशन आहे. यात वन्यप्राणी आणि निसर्गाचे अनोखे आणि मजेदार फोटो पाहायला मिळतात. यावर्षीचा हा पुरस्कार रशियन फोटोग्राफर Sergy Gorshkov ला सायबेरिअन वाघाचा खास फोटो काढण्यासाठी मिळाला आहे. त्यांनी हा फोटो रशियातील एका जंगलात छुप्या कॅमेऱ्याने टिपला आहे. या सुंदर फोटोत वाघीण रात्रीच्या अंधारात आपला चेहरा एका झाडावर घासत आनंद घेत आहे.
-
-
या पुरस्कारांमध्ये काही भारतीय फोटोग्राफर्सच्या फोटोंनाही चांगलीच पसंती मिळाली. त्यांचा समावेश ‘मोस्ट कमेंटेड फोटो’ या कॅटेगरीत झाला आहे. उत्तर प्रदेशच्या धृतिमान मुखर्जीच्या मगरीच्या फोटोला जोरदार पसंती मिळाली आहे. या फोटोत या मगरीच्या अंगावर शेकडो लहान मगरीची पिलं बागडत आहेत. हा फोटो चंबळच्या राष्ट्रीय उद्यानात काढला आहे.
-
-
गरुड आणि सापाचं शत्रुत्व अचुकपणे टिपलेल्या फोटोला देखील लोकांनी चांगलीच दाद दिली आहे.
-
-
15 ते 17 वर्षांच्या तरुण फोटोग्राफर्सच्या वर्गवारीत फिनलंडच्या Liina Heikkinen ने काढलेला फोटो सर्वोत्कृष्ट म्हणून निवडला आहे. या फोटोत कोल्हा आपली शिकार दगडांच्या आड लपून खात आहे.
-
-
अॅनिमल पोट्रेट प्रकारात डेन्मार्कचे फोटोग्राफर Mogens Trolle यांचा फोटोला पुरस्कार मिळाला. वाईल्डलाईफ फोटो जर्नलिज्म प्रकारात रशियन सर्कसमध्ये काम करणाऱ्या पोलर बिअरच्या फोटोला पुरस्कार मिळाला. हा फोटो Kirsten Luce यांनी क्लिक केला.
-
-
अॅनिमल पोट्रेट प्रकारातील पुरस्कार डेन्मार्कचे फोटोग्राफर Mogens Trolle यांनी काढलेल्या माकडाच्या खास फोटोला मिळाला.