ग्लोबल एनसीएपी(Global NCAP) चाचणीत रेनो ट्रायबर एमपीव्हीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुन्हा एकदा भारतातील सुरक्षित कारच्या यादीत फेरबदल करण्यात आले. नव्या यादीनुसार, 10 सुरक्षित कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या एकाही गाडीचा समावेश नाही. या यादीमध्ये आता टाटा मोटर्सच्या चार आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या तीन मोटारींचा समावेश आहे.