अभिनेता अक्षय कुमार हा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतो. मात्र सोबतच तो डायटही करतो. त्याच्या फिटनेसचं रहस्य आहे 'अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज'. तो सकाळी लवकर झोपेतून उठतो आणि रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो.
53 वर्षीय अक्षयचा फिटनेसमध्ये तोड नाही. अक्षयच्या दिवसाची सुरुवात म्हणजेच नाश्त्यात पराठा आणि दूध घेतो. अर्थातच तो काही वेगळं न करता घरातलं पौष्टिक जेवण करतो.
अक्षय दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, हिरव्या भाज्या आणि दही खातो.
त्याचं शेड्यूल टाईट असल्यानं तो रात्रीचं जेवण 7 वाजताच करतो आणि झोपण्यापूर्वी भूक लागलीच तर ऑम्लेट खातो.
तुम्हाला अक्षय सारखं फिट राहायचं असेल तर रोज व्यायाम करणं, दैनंदिन जीवनात बदल करणं महत्वाचं आहे. सोबतच योग्य तो आहार घेणही आवश्यक आहे.