Shah Rukh Khan I शाहरूख यापूर्वीही शूटिंग करताना झाला होता जखमी ; एकदा तर …

| Updated on: Jul 05, 2023 | 11:31 AM

1 / 5
Shah Rukh Khan Injured :  लॉस अँजिलिस येथे एका आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करताना अभिनेता शाहरूख खान जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी पहाटे शाहरुख मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. तेव्हा तो नेहमीप्रमाणे फिट अँड फाइन दिसत होता.  मात्र शूटिंग करताना जखमी होण्याची शाहरूखची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याला अनेकवेळा दुखापत झाली होती. (Photo : Instagram)

2 / 5
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डर' या चित्रपटाने शाहरुखला अभिनेता म्हणून नवी ओळख मिळवून दिली. यातील त्याच्या निगेटीव्ह भूमिकेचंही खूप कौतुक झालं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही शाहरुखला दुखापत झाली होती. एक जंपिंग सीन करताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्याच्या तीन बरगड्या तुटल्या होत्या, तसेच डाव्या पायाच्या घोट्यालाही दुखापत झाली होती.

3 / 5
 'माय नेम इज खान' चित्रपटाच्या सेटवरही असाच एक अपघात झाल्याने शाहरूखचा खांदा दुखावला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंगही काही काळ थांबवण्यात आले होते.

4 / 5
'शक्ती : द पॉवर ' चित्रपटातील इश्क कमीना हे गाणं खूप गाजलं होतं. मात्र हेच गाणं शूट करताना शाहरूखच्या पाठीला लागलं होतं. त्यानंतर त्याचं ऑपरेशनही करण्यात आलं होतं.

5 / 5
 'कोयला' चित्रपटात जेव्हा अमरीश पुरी हेलिकॉप्टरमधून शाहरुखचा पाठलाग करतात, तो सीन तुम्हाला आठवतोय का ? त्या सीनच्या शूटिंगदरम्यान हेलिकॉप्टरचा खालचा भाग शाहरुखवर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला मात्र त्याचा जीव थोडक्यात वाचला. तर याच चित्रपटातील 'होश ना खो दे कहें जोश में देखने वाला' या गाण्याचे शूटिंग सुरू असताना शाहरूखचा पाय मोडल्याने तो जखमी होता.