पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, तिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. माहिरा खान केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. ( photos : Instagram)
नुकताच तिचा नवा लूक समोर आला, ज्यामध्ये ती अक्षरश: डिस्ने प्रिन्सेस सारखी दिसत होती. शाहरुखची ही हिरॉईन दुबई मधील EMI GALA पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती.
माहिरा खानने या सोहळ्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने प्रसिद्ध डिझायनर मायकल सिन्कोच्या कलेक्शनमधील गाऊन परिधान केला. आइस ब्लू रंगाचा हा गाऊन माहिरावर खूप खुलून दिसत होता. परफेक्ट मेकअप आणि ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला.
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं.
माहिराचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. तिने अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'रईस' चित्रपटात तिने किंग खान अर्थात शाहरुखसोबत मोठ्या पडद्यावर काम केलं होतं.