इतर अभिनेत्रींप्रमाणे शमा सिकंदरही आपल्या फिटनेसची खास काळजी घेत असते. तिने सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊट सेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये शमा योगा करताना दिसत आहे. तिनं या पोस्टला 'Wherever you go, don’t forget yourself... Some yoga for my soul' असं कॅप्शन दिलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर जिम बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनेक कलाकारांनी घरातच वर्कआऊट करण्यास सुरुवात केली.
जिम बंद असले तरी शमाचं वर्कआऊटसाठी असलेलं डेडिकेशन या फोटोमध्ये पाहायला मिळतंय.
शमा सोशल मीडिवर सक्रिय असते. ती नेहमीच तिचे वर्कआऊट सेशनचे फोटो शेअर करत असते.