Marathi News Photo gallery Share Market These 5 stock lotteries in a single month; That will be a millionaire Axis Direct Know Target And Stoploss
30 दिवसांचं रिटर्न मशीन; हे 5 स्टॉक करतील मालामाल
Multibagger Stock : शेअर बाजाराचा विक्रीचा मूड आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. ॲक्सिस डायरेक्टने पुढील 30 दिवसांच्या हिशोबाने शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या टारगेट, स्टॉपलॉस प्राईसची संपूर्ण माहिती...
1 / 5
Cyient चा शेअर 1792 रुपयांच्या जवळपास आहे. हा स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. 1890 रुपये टारगेट तर 1735 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे. या स्टॉकमध्ये घसरणीचे सत्र आहे. एका महिन्यात 17 टक्के, तीन महिन्यात 20 टक्के आणि एका वर्षात आतापर्यंत 22 टक्क्यांची घसरण आली आहे.
2 / 5
Colgate चा शेअर 2832 रुपयांच्या स्तरावर आहे. 3172 रुपयांचे टारगेट आहे. 2722 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे. एक आठवड्यात 1 टक्के, दोन आठवड्यात जवळपास 6 टक्के आणि एका महिन्यात या स्टॉकमध्ये 4 टक्के रिटर्न मिळाला आहे.
3 / 5
रिएल्टी स्टॉक Sobha चा शेअर सध्या 1865 रुपयांच्या स्तरावर आहे. या स्टॉकची टारगेट प्राईस 2074 रुपये आहे. तर 1791 रुपयांचा स्टॉपलॉस आहे. एका आठवड्यात हा स्टॉक 1.5 टक्के, दोन आठवड्यात अर्धा टक्के, तर एका महिन्यात 1.2 टक्क्यांचा निगेटिव्ह रिटर्न या स्टॉकने दिला आहे.
4 / 5
CreditAccess Grameen चा शेअर 1460 रुपयांच्या स्तरावर आहे. या स्टॉकची टारगेट प्राईस 1604 रुपये आणि स्टॉपलॉस 1385 रुपये आहे. एका आठवड्यात हा शेअर 3.7 टक्के, दोन आठवड्यात 3.5 टक्के तर एका महिन्यात 2 टक्क्यांची घसरण या स्टॉकमध्ये आली आहे.. तीन महिन्यात या स्टॉकमध्ये 10 टक्के तर या वर्षात आतापर्यंत 8 टक्क्यांची घसरण आली आहे.
5 / 5
Jyothy Labs चा शेअर 436 रुपयांवर आहे. 478 रुपयांचे टारगेट आणि 413 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे. या स्टॉकने एका आठवड्यात 1.6 टक्के, दोन आठवड्यात 4.6 टक्के रिटर्न दिला आहे. (सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.)