सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत 2013 मध्ये आलेली 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड गाजली.
या मालिकेतून घराघरात पोचलेला 'श्री' म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय.
"पाहिले न मी तुला" या मालिकेतून तो पुनरागमन करतोय. आता या मालिकेत तो कोणत्या भूमिकेत असणार हे सरप्राईज असणार आहे.
शशांक सोबत या मालिकेत ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा या दोघांसोबत दिसणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.