PHOTO | लाल साडी, मंगळसूत्र, सिंदूर आणि मास्क; शिल्पा शेट्टीचा ‘रेड लूक’ सोशल मीडियावर व्हायरल
शिल्पाच्या या 'रेड लूक'ची बॉलिवूड जगतात चार्चा तर होत आहेच. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर सोबत मास्क बाळगल्याने तिची तिच्या फॅन्सकडून प्रशंसाही होत आहे.
यावेळी शिल्पा शेट्टी खास अशा लाल रंगाच्या साडीत स्पॉट झाली. कारोना संसर्ग होऊ नये म्हणून तिने आपल्यासोबत मास्कसुद्धा ठेवला होता.
Follow us on
प्रसिद्ध अभिनेता आनिल कपूरची पत्नी सुनीता आपल्या घरी करवा चौथनिमित्त दरवर्षी पूजेचा कार्यक्रम ठेवते. या वर्षीदेखील तिने या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या अभिनेत्र्यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुद्धा करवा चौथनिमित्त सुनीता कपूरच्या घरी गेली.
यावेळी शिल्पा शेट्टी खास अशा लाल रंगाच्या साडीत स्पॉट झाली. कारोना संसर्ग होऊ नये म्हणून तिने आपल्यासोबत मास्कसुद्धा ठेवला होता.
शिल्पाच्या या ‘रेड लूक’ची बॉलिवूड जगतात चर्चा तर होत आहेच. त्याचबरोबर घरातून बाहेर पडल्यानंतर सोबत मास्क बाळगल्याने तिची तिच्या फॅन्सकडून प्रशंसाही होत आहे.
शिल्पाने करवा चौथनिमित्त लाल साडीसोबत मंगळसूत्र, नेकलेस, हातात लाल चुडा, लाल रंगाचा सिंदूर अशा खास लूकमध्ये सुनीता कपूरच्या घरी हजेरी लावली.
शिल्पा शेट्टीचा हा ‘रेड लूक’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लाल रंगाच्या साडीतील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून लाखोंनी लाईक्स मिळत आहेत.
दरम्यान, सुनीता कपूरचा घरी इतरही दिग्गज अभिनेत्र्या करवा चौथनिमित्त पूजा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांचेही लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.