हर हर महादेव ! , साताऱ्यातील शिंगणापूर शंभू महादेव मंदिरात हळदी समारंभास प्रारंभ
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस प्रारंभ झाला आहे. सनई चौघड्यांच्या सुरात हरहर महादेवाच्या जयघोषात शिव-पार्वती हळदी समारंभ पार पडला.
1 / 5
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस प्रारंभ झाला आहे. सनई चौघड्यांच्या सुरात हरहर महादेवाच्या जयघोषात शिव-पार्वती हळदी समारंभ पार पडला. या हळदी सोहळ्यासाठी वधू-वरांकडील जिरायतखान, मानकरी, सेवाधारी यांसह भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 / 5
गेली दोन वर्ष शंभूमहादेव यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने सलग दोन वर्ष शिखर शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात आली होती.यावर्षी मात्र प्रशासनाने शंभू महादेव यात्रेस परवानगी दिल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
3 / 5
शिखर शिंगणापूरातील शंभू महादेवमहादेवाचे आणि शिंगणापूर गाव हे यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवली आहे. असा उल्लेख इतिहासात आपल्याला मिळतो. या मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे वास्तवाला होता.
4 / 5
महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून ३४५० फूट उंचीवर आहे. हे हेमाडपंती शैलीतील मंदिर खूप सुंदर तर आहेच; पण वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुनाही आहे. मंदिराच्या परिसरातील दीपमाळा लांबूनच लक्ष वेधून घेतात. मोठ्या घंटा हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य. या घंटांपैकी एक घंटा पोर्तुगीज बनावटीची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिव-पार्वतीचे प्रतीक मानतात.
5 / 5
इतिहासातील काही दस्तावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी शिंगणापूर येथे देणगी देऊन विहीर बांधल्याचे सांगितले जाते. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. सध्या हे मंदिर शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे आहे.