Marathi News Photo gallery Shivalinga cow calf katyar sun moon sculpture inscriptions from the reign of chalukya emperor vikramaditya found in jat taluka
Photo : ‘शिवलिंग, गाय-वासरु, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन…’,जत तालुक्यात सापडला चालुक्य सम्राट विक्रमादित्य यांच्या कारकीर्दीतील शिलालेख
VN |
Updated on: Mar 18, 2021 | 11:48 AM
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मल्लाळ येथे डोंगरावर जमीन नांगरत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख सापडला आहे. (‘Shivalinga, Cow-Calf, Katyar, Sun-Moon Sculpture…’, Inscriptions from the reign of Chalukya Emperor Vikramaditya found in Jat taluka)
1 / 8
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मल्लाळ येथे डोंगरावर जमीन नांगरत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख सापडला आहे.
2 / 8
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्राध्यापक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. सन 1120 मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे.
3 / 8
या शिलालेखातून चालूक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे.
4 / 8
जत तालुक्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. मल्लाळ हे गाव जतपासून सुमारे चार किलोमीटरवर आहे. या गावच्या दक्षिणेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर खडकाळ जमीन आहे.यापैकी दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे यांना एक मोठा दगड आढळून आला.
5 / 8
या दगडावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन आहे. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. याची माहिती मारूती ओलेकर आणि ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. त्यांनी सदर ठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला.
6 / 8
या शिलालेखात एकूण 13 ओळी आहेत. या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे. चालूक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी होता. त्याने ५० वर्षे राज्य केले.
7 / 8
त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामीळनाडू पर्यंत भिडल्या होत्या.. त्याच्या काळात कला, विद्या यांचा मोठा विकास झाला.चालुक्य सम्राट विक्रमादित्य हा इसवी सन 1076 मध्ये गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला.
8 / 8
कराडच्या शिलाहर राजवंशातील चंदलादेवी ही विक्रमादित्याची महाराणी होती. कराडमध्ये झालेल्या स्वयंवरात तिने विक्रम राजाला पती म्हणून निवडले होते. पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली. त्या मंदिरांसाठी जमीनी दान देण्यात आल्या. त्यासंबंधी अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे.