Marathi News Photo gallery Shivrajyabhishek Din Raigad Celebration of ShivRajyabhishek Day in Raigad with enthusiasm, Sambhaji Raje Chhatrapati's guidance to Shiv loving people
Shivrajyabhishek : दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न, मावळ्यांच्या घोषणांनी रायगड दुमदुमला, संभाजीराजे शिवरायाचरणी नतमस्तक
रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. त्यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी रायगडावर जमा झाले होते.
1 / 7
रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे रायगडावर हा सोहळा होऊ शकला नाही. मात्र, यंदा शिवप्रेमींनी मोठ्या थाटामाटात शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पाडला.
2 / 7
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरातील जनतेला रायगडावर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो मावळे आज रायगडावर पोहोचले.
3 / 7
संभाजीराजे आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी शिवराज्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसह संपूर्ण रायगड किल्ल्यावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
4 / 7
संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे आणि पुत्र शहाजीराजे यांनी रायगडावर आलेल्या शिवप्रेमी जनतेशी संवाद साधला. तसंच त्यांना शिवरायांच्या विचारावर चालण्याचं आवाहनही केलं.
5 / 7
रायगडावर सर्व मावळ्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी संभाजीराजे आणि शहाजीराजे यांनी सर्व शिवप्रेमी जनतेसह रांगेत उभे राहून जेवण घेतलं आणि त्याचा आस्वाद घेतला.
6 / 7
शिवराज्याभिषेक दिन असो वा शिवजयंती... मावळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. आज अनेक शिवप्रेमी मावळ्याच्या वेशभूषेत रायगडावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या घोषणांनी रायगडावरील वातावरण भारावून गेलं होतं.
7 / 7
संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांनी रायगडावरील शिव मंदिरात पुजा केली आणि महादेवाचं दर्शनही घेतलं.