शिवसेनेची ‘स्नॅक्स डिप्लोमसी’; गुजराती मतांसाठी मेळाव्यात वडापाव-जिलेबी, फाफडाची फोडणी!

| Updated on: Jan 10, 2021 | 7:28 PM

शिवसेनेने गुजराती भाषिक मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी खास मोहीम सुरू केलेली आहे. (Shivsena Gujarati Melava In Mumbai)

1 / 10
येत्या मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता शिवसेनेने गुजराती भाषिक मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी खास मोहीम सुरू केलेली आहे.

2 / 10
‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

3 / 10
अंधेरी-ओशिवरा या ठिकाणच्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित होते.

4 / 10
यावेळी 11 गुजराती उद्योगपतींनी शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

5 / 10
या मेळाव्यात मराठी भाषिकांची खासियत वडापाव आणि गुजराती भाषिकांची स्पेशल डिश जिलेबी फाफडा या दोन्ही पदार्थांची सांगड घालण्यात आली होती.

6 / 10
या मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्वांना वडापाव, फाफडा, जिलेबी, बटाट्याची भाजी, शेव हे पदार्थ खाण्यासाठी देण्यात आले.

7 / 10
यावरुन मुंबईत मराठी माणूस आणि गुजराती माणूस एकत्र आहेत, हे दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.

8 / 10
मुंबईतील 50 ते 55 वॉर्डमध्ये गुजराती भाषिकांची संख्या जास्त आहे.

9 / 10
मुंबईत एकूण 227 वॉर्ड पैकी 50 ते 55 वॉर्डमध्ये गुजराती मतदारांची जर ही ताकद वाढवली तर शिवसेनेसाठी ती जमेची बाजू ठरेल.

10 / 10
 त्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटक हेमराज शहा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.