नवीन कार खरेदी करताना आपण बरेच नियोजन करतो ज्यात बजेट, इंजिन, फीचर्स, स्टाईल आणि कारचा रंग हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. परंतु आता या सर्वांव्यतिरिक्त आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट विचारात घेऊन कार खरेदी करावी लागेल, ती म्हणजे पार्किंगची जागा (Parking Space).
आता कार खरेदी करताना आपल्याला सांगावे लागेल की, आपल्याकडे नवीन कार पार्क करण्यासाठी पर्याप्त जागा आहे की नाही. वास्तविक, हे नवीन नियम AMC (Ahmedabad Municipal Corporation) च्या नवीन पार्किंग धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. या धोरणात केंद्र सरकारने 2017 मध्ये सादर केलेल्या रस्ते आणि वाहतूक विधेयक यांसारख्या तरतुदी आहेत.
गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेच्या (AMC) नवीन पार्किंग पॉलिसीनुसार (New Parking Policy) कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना आपल्याकडे पार्किंगची जागा आहे की नाही याबाबतची माहिती द्यावी लागेल. जर तुमचं उत्तर होय असं असेल तर तुम्हाला त्याचा पुरावा सादर करावा लागेल, त्यानंतरच आपण एक नवीन कार खरेदी करु शकाल.
शहरातील कोणत्याही एका व्यक्तीने अनेक वाहने खरेदी करण्याची सिस्टम थांबविणे किंवा त्याचे प्रमाण कमी करणे, हे धोरण आणण्यामागचे प्रमुख उद्दीष्ट आहे. याव्यतिरिक्त इतर किंवा अधिक मोटारींच्या खरेदीसाठी लोकांकडून अधिक करदेखील आकारला जाईल.
Car parking