अयोध्येत भगवान श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रथमच भगवान श्री राम यांची त्यांच्या जन्मभूमीवर रामनवमी साजरी होत आहे.
अयोध्येतील राममंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आज अयोध्येत प्रथमच राम जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय.
अयोध्येत रामनवमीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रामनवमीनिमित्त दुपारी 12 वाजता रामललाचा सूर्याभिषेक होणार आहे.
रामनवमीनिमित्त प्रभू श्री राम यांना आकर्षक सजावट करण्यात येत आहे. यासाठी त्यांना वेदमंत्रांच्या पठणासह दूध व इतर पदार्थांनी स्नान घालण्यात आले.
संपूर्ण राम मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. भाविकांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.