सोशल मीडियावरही श्रेया चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांच्या भेटीचे खास क्षण ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असते.
'चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. या शो मधून प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाते. फिरायला गेल्यानंतर तेथील पर्यटन स्थळाचे फोटोही पोस्ट करत असतात.
श्रेया नुकतीच गोव्यामध्ये एन्ज़ॉय करताना दिसून आली आहे. गोवा ट्रीपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
गोव्यात समुद्र किनाऱ्यावर फिरतानाचे फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये तिने पिंक कलरचा आऊटफीट शेअर केला आहे.
गोव्याच्या ट्रीपमध्ये मासे फ्राय, फिश करी, भात या गोव्याच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेल्या थाळीचा आनंद लुटला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वेळा घालवताना श्रेया समुद्र किनाऱ्यावर कुल अंदाजात मज्जा करताना दिसून आली आहे.