Sikkim Flood : सिक्कीममध्ये ढगफुटी, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्ये; हजारो पर्यटक अडकले
Sikkim Flood Update : सिक्कीममध्ये महापूर आला आहे. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे हाहा:कार उडाला आहे. सिक्कीममध्ये सध्या हजारो पर्यटक अडकले आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. वाचा सविस्तर...
1 / 5
सिक्कीममध्ये सध्या महापुराची स्थिती आहे. ल्होनक तलावाच्या परिसरात अचानक ढगफुटी झाली आहे. त्यामुळे तीस्ता नदीला पूर आलाय. यामुळे नदीकाठच्या लोकांचं मोठं नुकसान झालंय.
2 / 5
सिक्कीममध्ये आलेल्या या पुरात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जवानांसह 102 जणांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. तर 3000 पर्यटकही सिक्कीममध्ये अडकले आहेत.
3 / 5
तीस्ता नदीची पाणी पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 10 देखील पाण्याखाली गेला आहे.
4 / 5
सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील लोनाक सरोवराच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तीस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मंगन, गंगटोक, पाकयोंग आणि नामची या जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाली आहे.
5 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सिक्कीमला सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. तर तमांग यांनी पूरग्रस्त सिंगताम भागाला भेट दिली.