प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या शरीरयष्टीत मोठा बदल करत चाहत्यांना धक्का दिला आहे. स्वतःला सडपातळ व फिट बनवण्यासाठी त्याने खूप वजन कमी केलं आहे.
त्याने स्वतःमध्ये केलेल्या या परिवर्तनाचा चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचे त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन व्यतिरिक्त, त्याची ग्रूमिंग पाहून लोक आणखी आश्चर्यचकित झाले आहेत
अदनान सामीने मालदीवच्या व्हेकेशनचे त्याचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. अदनानने काळा टी-शर्ट, एव्हिएटर सनग्लासेस, समुद्राजवळून ट्रिम केलेला लूक घेऊन, अदनानने समुद्राजवळील स्वतःचा एक उत्कृष्ट फोटो शेअर केला आहे. त्याच्या कुटुंबासोबतचा आणखी एक फोटोही त्याने शेअर केला आहे.
त्यांचे हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिले- 'नेमकं तुम्ही कोण आहात? दुसऱ्या एकाने लिहिले आहे की , कोणी इतकेहॉट कसे असू शकते?' एका यूजरने लिहिले- 'मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही... मोठा बदल अश्या कमेंट केल्या आहेत.
'शानदार जॉ लाइन और गजब का वेट लॉस #Inspiration' असे कॅप्शन लिहीत एका युझरने त्याला त्याच्या आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे असे म्हटले आहे.
अदनानने याआधीही त्याचे ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केले आहेत. काही लोकांनी त्याच्या वजन कमी करण्यावर एडिटिंग केले आहे असे म्हणून टीका केली आहे.