Marathi News Photo gallery Sini Shetty's fascinating journey from Bharatanatyam dancer, graduation in finance to Miss India 2022
Miss India 2022 Sini Shetty : भरतनाट्यम नृत्यांगना , फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन ते मिस इंडिया 2022 चा किताब सिनी शेट्टीचा रंजक प्रवास
यावेळी मिस इंडियाच्या शर्यतीत 31 सुंदरींमध्ये चुरशीची स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया स्पर्धा जिंकली. कोण आहे मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टी.
1 / 6
सिनी शेट्टीने आज मिस इंडिया 2022 चा किताब जिंकला आहे. 3 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये एका नेत्रदीपक स्पर्धेनंतर सिनी शेट्टीला मिस इंडियाचा मुकुट प्रदानआला.
2 / 6
यावेळी मिस इंडियाच्या शर्यतीत 31 सुंदरींमध्ये चुरशीची स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया स्पर्धा जिंकली. कोण आहे मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टी.
3 / 6
शेट्टी मिस इंडिया 2022 ची विजेती ठरलेली सिनी शेट्टी 21 वर्षांची आहे. सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला, पण मूळचा कर्नाटकची असून तिने अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. याशिवाय ती CFA (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट) करत आहे.
4 / 6
मिस इंडियाचा ताज जिंकलेली सिनी शेट्टी केवळ अभ्यासातच चांगली नाही तर ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. त्यांनी वयाच्या 4 व्या वर्षी नृत्य करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी स्टेजवर सादरीकरण केले.
5 / 6
मिस इंडिया 2022 च्या विजेतेपदापूर्वी तिने उप-स्पर्धांमध्ये मिस टॅलेंट पुरस्कार जिंकला आहे. मिस इंडिया 2022 चे मुकूट कर्नाटकच्या सिनी शेट्टीकडे गेला तर राजस्थानच्या रुबल शेखावतला फर्स्ट रनर अप म्हणून घोषित करण्यात आले. तर उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान मिस इंडिया 2022 ची सेंकड रनर अप झाली.
6 / 6
सिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ६६.३ हजार फॉलोअर्स आहेत. आता ती मिस इंडिया 2022 बनली आहे, त्यामुळे फॉलोवर्सच्या संख्याही वेगाने वाढतआहे.