वर्ष सरत आलं की सर्वजण नव्या वर्षाचे संकल्प तयार करतात. बरेच जण वजन कमी करण्याचा आणि फिट राहण्याचा संकल्प सोडतात. तुम्हीही असाच विचार करताय का ? तसं असेल तर नव वर्षं उजाडेपर्यंत वाट पाहू नका, आजचा तयारी सुरू करून प्लॅनिंग करा. नवीन वर्षात काही गोष्टींचे पालन केल्यास वजन कमी करणे तुमच्यासाठी सोपे होईल.
हायड्रेटेड रहावे - आपले शरीर तंदुरुस्त रहावे व त्याचे काम सुरळीतपणे चालावे यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जास्त पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते व वेळीअवेळी भूक न लागल्याने क्रेव्हिंगही कमी होते. तसेच शरीराचा मेटाबॉलिक रेटही वाढतो.
क्रेव्हिंग कंट्रोल करा - अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डाएट तर करतात, पण अशावेळी त्यांना वारंवार आवडीचे पदार्थ किंवा मिठाई खायची खूप इच्छा होते. आणि सगळी मेहनत पाण्यात जाते. तुम्हालाही गोड खायची इच्छा झाली तर तेव्हा फळं किंवा ड्रायफ्रुट्स खावीत.
डाएट प्लान - वजन कमी करताना सर्वप्रथम स्वत:कडे लक्ष द्या. आहारातून फॅट्स शक्य तितके कमी करा. तसेच साखर आणि मीठाचे प्रमाणही हळू-हळू कमी करावे. आहाराकडे नीट लक्ष द्यावे.
रोज पुरेशी झोप घ्या - झोपेच्या कमतरतेमुळेही लठ्ठपणा वाढतो. पुरेशी झोप झाली नाही तर शरीरावरील सूज वाढते आणि व्यक्ती जाड दिसू लागते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.