बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
आपले हसमुख फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होते.
सध्या स्मिता एका नव्या भूमिकेत चाहत्यांचं मन जिंकतेय. ती भूमिका म्हणजे सुत्रसंचलकाची.
स्मिता सध्या ‘कॉमेडी बिमिडी’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय. त्यामुळे या कार्यक्रमात हास्याच्या मेजवानीसोबतच स्मिताचा ग्लॅमरस अंदाजही पाहायला मिळतोय.
आता स्मिताचे हे ब्लॅक टॉपमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.