कोरोनामुळे जवळजवळ 6 महिने मनोरंजन क्षेत्र ठप्प झालं होतं. मात्र आता अनलॉकमध्ये मालिकांचं आणि चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं आहेत.
अशात आता एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी' .
'कॉमेडी बिमेडी' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच खळखळून हसवतोय, या सेटवरुन विनोदाची मेजवानी प्रत्येक घराघरात पोहोचतेय.
अशात या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
आता स्मितानं सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
लाल आणि पांढऱ्या रंगाच्या या आउटफिटमध्ये तिचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतंय.