कोल्हापूरात पंचगंगा नदी (Panchganga river) नंतर आता रंकाळा तलावाच्या (rankala lake) प्रदूषणाचा देखील प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
प्रदूषित पाण्यामुळे रंकाळा तलावातील शेकडो मासे मृत (fish death) झाले आहेत. त्यामुळे तलावा काठी मृत माशांचा खच पाहायला मिळतोय.
गेल्या तीन ते चार दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जातय. या प्रकारामुळे आता परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे.
विशेष म्हणजे हे मृत मासे तलाव बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासून काम करत आहेत.
मात्र त्यांना सुरक्षेची साधने देखील पुरवली नसल्याचं दिसून येतय.
रंकाळा तलाव परिसरात वाढलेल्या नागरी वस्तीचे सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत आहे.त्यामुळेच या प्रदूषणात वाढ झाल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे.
रंकाळा तलावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाने आधी या तलावाचे संवर्धन करावं अशी मागणी देखील होतेय.