शेतकऱ्यांने घरावर उभारला SHIVAJI MAHARAJ यांचा अश्वारूढ पुतळा, परिसरात घराची चर्चा
महेश घोलप |
Updated on: Mar 26, 2022 | 2:07 PM
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील शेतकरी तुकाराम शिंदे यांनी घरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे. शेतकरी तुकाराम शिंदे यांचं महाराजांबद्दल असणारं प्रेम यातून व्यक्त झालं आहे.
1 / 4
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील शेतकरी तुकाराम शिंदे यांनी घरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे. शेतकरी तुकाराम शिंदे यांचं महाराजांबद्दल असणारं प्रेम यातून व्यक्त झालं आहे. पुतळा उभारल्यापासून त्याची परिसरात चर्चा आहे. तसेच पुतळा पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातील अनेक शिवप्रेमी शेतकरी तुकाराम शिंदे यांच्या घराला भेट देत आहेत.
2 / 4
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. निंभोरे येथील तुकाराम शिंदे यांचा व्यवसाय शेती आहे. त्यांची दोन मुले पुण्यात गॅरेज काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महान असून ते कधीही विसरणारे नाही.
3 / 4
आज आम्ही जे घडलो ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच त्यांना कोणीही विसरू शकत नाही. माझ्या मोठ्या मुलाची भावना होती, की आपण महाराजांचा पुतळा उभा केला पाहीजे. महाराजांच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे हा पुतळा उभा केला आहे असं शेतकरी तुकाराम शिंदे यांनी सांगितलं.
4 / 4
महाराष्ट्रात नुकतीच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीदिवशी अनेक चांगले उपक्रम महाराष्ट्रात राबिवण्यात आले. त्याचबरोबर कोरोनाची नियमावली पाळून शिवजयंती साजरी करण्यात आली.