पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात का ? कलर- शांपू नव्हे, हे उपायही करून पहा..
केस अकाली पांढरे होणे ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे आहे.पण अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? कलर-शांपूशिवाय काही इतर उपायांनीही केस पुन्हा काळे करता येतात.
1 / 5
अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न लोकांना सतावतो. तर काही मार्गांनी केस पुन्हा काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
2 / 5
अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न लोकांना सतावतो. तर काही मार्गांनी केस पुन्हा काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
3 / 5
ताण घेऊ नका : टेन्शन किंवा इतर समस्यांमुळे तणाव येतो आणि अशा स्थितीत केस पांढरे होऊ लागतात. आयुष्यात तणाव नसणे हे तर शक्य नाही, पण काही पद्धतींचा अवलंब करून तो कमी किंवा दूर केला जाऊ शकतो.
4 / 5
ही जीवनसत्त्वे आहेत आवश्यक: केस निरोगी ठेवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन बी12, फोलेट, कॉपर आणि लोह यांसारखे पोषक घटक आवश्यक असतात. सकस, पौष्टिक अन्नाचे सेवन केल्याने शरीरातील या पोषक घटकांची कमतरता पूर्ण होऊ शकते व तुम्ही पुन्हा काळे केस मिळवू शकता.
5 / 5
कोरफडीचा वापर करा : कोरफड ही अष्टपैलू आहे. तिच्या गुणधर्मांमुळे ती केस, त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. तुम्ही केसांसाठी कोरफडीच्या जेलचा मास्क वापरू शकता. त्यासाठी कोरफडीचे पान कापून स्वच्छ धुवून घ्या, नंतर कोरफडीचा गर काढून तो मिक्समधून फिरवून घ्या व केसांना लावा. हे मिश्रण थोड्या वेळ केसांवर राहू द्यास वाळल्यानंतर सौम्य केस शांपूने स्वच्छ धुवा.