जावाई म्हटले की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहाण्यासाठी मिळाला असेल. पण विड्याचं मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळं चित्र पाहावयास मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे.
जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा केजच्या विडा गावात आहे.
जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा केजच्या विडा गावात आहे.
मागच्या 100 वर्षांपासून धुलिवंदनाला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरणार आहेत.
श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले आहे. थोड्याच वेळात त्यांची गाढवावर बसवून वरात निघणार आहे.