सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
सोनाक्षीनं सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. या चित्रपटात तिनं आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. त्यामुळेच तिला दबंग गर्ल म्हणून ओळखलं जातं.
त्यानंतर ती रावडी राठोड, सन ऑफ सरदार, हॉलिडे या चित्रपटांमध्ये झळकली.
आता सोनाक्षी ‘भूज’ या चित्रपटात झळकणार आहे.