मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता हेमंत ढोमे हे दोघंही लंडनमध्ये चित्रीकरणासाठी पोहोचले होते.
या चित्रपटात सोनालीसोबत अभिनेता हेमंत ढोमेसुद्धा झळकणार आहे. हे दोघंही चित्रीकरणादरम्यान धमाल करत आहेत.
'जरा सा झूम लू मैं' या गाण्यावर या दोघांनीही ठेका धरला. त्याचा व्हिडीओ सोनालीनं इन्स्टाग्रामवर शेअरसुद्धा केला आहे.
एवढंच नाही तर दोघांनी मस्त फोटोशूटसुद्धा केला आहे. या फोटोला शेअर करताना त्यांनी रेट्रो इफेक्ट दिला आहे.
सोनाली आता भारतात परतली आहे. तिनं मुंबईत विमानतळावर पोहोचल्यावर इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ही माहिती दिली आहे.