मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आणि मराठीमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच लंडनमध्ये 'Dateभेट' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.
तिचा आगामी चित्रपट 'Dateभेट'च्या चित्रीकरणासाठी ती लंडनमध्ये होती. या चित्रीकरणादरम्यान तिनं संपूर्ण टीमसोबत खूप धमाल केली आहे.
चित्रीकरण सुरू असताना तिनं अनेक फोटोशूटही केले आहेत. याची झलक तिनं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली.
अभिनेता हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांच्यासोबत तिनं खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'Dateभेट'या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून संपूर्ण टीम आता भारतात परतली आहे.