अभिनेता सोनू सूद कोरोना बाधित प्रत्येक व्यक्तिची मदत करण्याचा प्रयत्न करतोय. मागील वर्षीपासून, त्यानं लोकांना मदत करण्याचं काम हाती घेतलं आहे, यामुळे लोक त्याला आपला माणूस समजू लागले आहेत. दरम्यान, सोनू सूद यांनी कॅमेरामॅनची काळजी घेतली. सोनू सूदनं पापाराझींना समर ड्रिंक दिलं.
आज, मंगळवारी सोनू सूद घरातून बाहेर पडताना दिसला. तो पापाराझींना भेटायला घराबाहेर पडला. या उन्हाळ्याच्या काळात पापाराझींना थोडा आराम मिळावा म्हणून सोनूनं आपल्याबरोबर काही ड्रिंक आणलं.
सोनू सूदनं दिलेल्या या समर ड्रिंकमुळे पापाराझींना काही प्रमाणात उष्णतेपासून मुक्तता मिळाली. यावेळी मीडियानं सोनू सूदला सांगितलं की चाहत्यांना तुम्हाला पंतप्रधान होताना बघायचं आहे. तुम्ही पंतप्रधान व्हावं अशी राखी सावंतची सुद्धा इच्छा आहे.
या प्रश्नावर सोनू सूदनं एक अतिशय मजेदार उत्तर दिलं. तो म्हणाला की मी एक सामान्य माणूस आहे.