मानसीनं तिच्या या वाढदिवसाला सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली आहे. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सगळ्यांना सांगितलं. तेव्हापासून सोशल मिडीयावर या कपलची जोरदार चर्चा रंगली. नोव्हेंबर महिन्यात दोघांनी साखरपुडा देखील केला आहे
येत्या 16 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.
लग्न जवळ आलं असताना आता मानसी आणि प्रदीपनं हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे.
मानसी आणि प्रदीपचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
या फोटोमध्ये मानसीनं काळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे. तर प्रदीपनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्यावर लाल रंगाचं जॅकेट कॅरी केलं आहे.