Happy Birthday Raveena : रवीनाच्या आयुष्यातील खास गोष्टी, पाहा खास व्यक्तिंचे फोटो
रवीना 2019 मध्ये आजी बनली. ती आपल्या नातवासोबत फोटोसुद्धा शेअर करत असते. (Special things of Raveena's life, pictures of her family)
Follow us on
बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडन आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टींमुळेसुद्धा नेहमी चर्चेत असते. वयाच्या 46 व्या वर्षीच ती आजी बनली आहे.
ही गोष्ट मान्य करणे जरा अवघड आहे, मात्र हे खरं आहे. रवीना 2019 मध्ये आजी बनली. ती आपल्या नातवासोबत फोटोसुद्धा शेअर करत असते.
रवीनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 मध्ये झाला होता. तिनं वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये 11 वर्षीय पूजा आणि 8 वर्षीय छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.
तिनं या दोन्ही मुलींना सांभाळलं आणि त्यांचं लग्न करुन दिलं. छायानं 2019 मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव रुद्र ठेवण्यात आलं. याच रुद्रसोबत रवीना नेहमी फोटो पोस्ट करत असते.
2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशा नावाच्या मुलीला जन्म दिला.
राशाच्या जन्मानंतर 2008 मध्ये रणवीरवर्धनचा जन्म झाला. ती आपल्या चारही मुलांसोबत नेहमी फोटो शेअर करते.