Photo Nagpur : तिरंगा पदयात्रेमध्ये नागपूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
नागपूर महानगरपालिका आणि मॅट्रिक्स वॉरिअर्स संस्थेतर्फे फ्लॅश मॉब आणि देशभक्ती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनच्या युवकांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.
तिरंगा पदयात्रेमध्ये नागपुरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
-
-
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी त्रिशताब्दी चौक ते त्रिशरण चौक पर्यंत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
-
-
यावेळी आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, माजी आमदार सर्वश्री गिरीश व्यास, डॉ मिलिंद माने, नाना शामकुळे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, श्री. संदीप जोशी, नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, माजी सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
-
-
भारतरत्न संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नागरिकांना स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाची शुभेच्छा दिली. त्यांनी प्रत्येकाला या देश गौरवाच्या अभियानात सामिल होण्याचे आवाहन केले.
-
-
या तिरंगा पदयात्रेमध्ये नागपूर शहरातील नागरिक हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ च्या जयघोषाणे दुमदुमला. सर्वांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता. संपूर्ण वातावरण तिरंगामय झाले होता.
-
-
पं. बछराज व्यास स्कूल, ठवरे हायस्कूल, साईनाथ स्कूल, मानवता स्कूल, साखरे स्कूल शाळेतील मुलांनी रॅलीत सहभाग नोंदवला. बँड पथकातर्फे देशभक्ती गीतांची प्रस्तुती करण्यात आली. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभुषेत सर्जेराव गलपत हे आकर्षणाचे केंद्र होते.