आर अश्विनचे रेकॉर्ड्स ब्रेक करणं अवघड! भारतीय ऑलराउंडरने काय काय केलं?
R Ashwin Records : आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अश्विनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत असे काही विक्रम केले जे जवळपास मोडीत काढणं अवघड आहे.
1 / 10
टीम इंडियाचा ऑलराउंडर आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनने 13 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत असे काही विक्रम केलेत जे पुढील काही वर्षात ब्रेक होणं जवळपास अवघड आहे. (Photo Credit : Bcci X Account)
2 / 10
आर अश्विन टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने 765 विकेट्स घेतल्यात. तर अनिल कुंबळे याच्या नावावर 953 आंतरराष्ट्रीय विकेट्सची नोंद आहे. (Photo Credit : R Ashwin X Account)
3 / 10
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी 537 विकेट्स घेतल्यात. तर टीम इंडियाकडून सर्वाधिक कसोटी विकेट्सचा विक्रम हा अनिल कुंबळेच्या नावावर आहे. (Photo Credit : Icc X Account)
4 / 10
आर अश्विनने मायदेशात 475 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मायदेशात टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)
5 / 10
अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या सर्वाधिक 11 वेळा 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथ्यया मुरलीथरन हा देखील 11 वेळा 'मालिकवीर' ठरला आहे. (Photo Credit : R Ashwin X Account)
6 / 10
अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एलबीडबल्यूद्वारे 300 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. अश्विनआधी मुथय्या मुरलीथरन याने 336 तर जेम्स अँडरसनने 320 फलंदाजाना एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. तर अश्विनने एलबीडब्ल्यूद्वारे 302 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : Ajinkya Rahane X Account)
7 / 10
आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 500 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने अवघ्या 98 डावांमध्ये ही कामगिरी केली. (Photo Credit : R Ashwin X Account)
8 / 10
अश्विन एकाच सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेणारा चौथा भारतीय खेळाडू आहे. अश्विनआधी रवींद्र जडेजा, विनू मंकड आणि पॉली उमरीगर या तिघांनी अशी कामगिरी केली आहे. (Photo Credit : Icc X Account)
9 / 10
अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा मुथय्या मुरलीथरन याच्या नावावर आहे. (Photo Credit : R Ashwin X Account)
10 / 10
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा विद्यमान कर्णधार बेन स्टोक्स याला तब्बल 13 वेळा आऊट केलं आहे. अश्विन एका फलंदाजाला सर्वाधिक वेळा आऊट करणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. (Photo Credit : Icc X Account)