चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी 8 संघ पात्र, दोन संघांना बाहेरचा रस्ता
वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना चॅपियन्स ट्रॉफी 2025 साठी आठ संघ पात्र ठरले आहेत. तर दोन संघांना या शर्यतीत स्थान टिकवता आलं नाही. बांगलादेशनं नेट रनरेटच्या जोरावर स्थान मिळवलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे.
1 / 10
भारताने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकले आहेत. 18 गुणांसह टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी तिकीट मिळालं आहे.
2 / 10
दक्षिण अफ्रिकेने 14 गुण आणि +1.261 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळणार आहे.
3 / 10
ऑस्ट्रेलिया 14 गुण आणि +0.841 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठीचं स्थान पक्कं झाल आहे.
4 / 10
न्यूझीलंडने 10 गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी आपलं नाव पक्कं केलं आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीत धडक देणारा चौथा संघ ठरला आहे.
5 / 10
पाकिस्तानची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. उपांत्य फेरी गाठता आली नाही. मात्र चॅम्पियन ट्रॉफीत स्थान मिळवलं आहे. यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने पात्र ठरला नसता तरी स्थान मिळालंच असतं.
6 / 10
अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी एन्ट्री मिळाली आहे.
7 / 10
इंग्लंडचा संघ चॅम्पियन ट्रॉफीत पात्र ठरेल की नाही याबाबत शंका होती. मात्र शेवटच्या टप्प्यात जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडने कमबॅक केलं. 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025 खेळणार आहे.
8 / 10
बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत करत चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये स्थान मिळवलं आहे. अवघ्या काही नेट रनरेटच्या जोरावर एन्ट्री मारली आहे.
9 / 10
श्रीलंकन संघ चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी अपात्र ठरला आहे. बांगलादेश आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 4 गुण असले तरी नेट रनरेटच्या बाबतीत गणित बिघडलं आहे.
10 / 10
नेदरलँडने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत मोठा उलटफेर केला. पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पात्र होण्यास अपयशी ठरले आहेत.