सामन्यात मोठी अडसर, नागपुरात टी-20 सामना होणार की नाही?
नागपुरात ढगाळ वातावरण असून कधीही पाऊस पडू शकतो. यामुळे टीम इंडियाचं प्रक्टिस सेशन रद्द करण्यात आलं आहे. दिवसभर पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आल्यानं सामन्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
1 / 5
टीम इंडियाला पलटवार करण्याची संधी असताना आता नागपुरात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढगाळ वातावरणामुळे नागपुरात कधीही पाऊस पडू शकतो. त्यामुळे टीम इंडियाचा सामना देखील होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
2 / 5
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी- 20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यानंतर आता या सामन्याला महाराष्ट्रातील नागपुरात उत्तर देण्याची चांगली संधी आहे. मात्र, पाऊस कधीही येऊ शकतो, असं बोललं जातंय.
3 / 5
नागपुरात आज टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन रद्द करण्यात आलं आहे. पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं आज खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, असंच ढगाळ वातावरण असल्यास सामना देखील रद्द होऊ शकतो, असंही बोललं जातंय.
4 / 5
हवामान खात्यानं नागपुराता शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बदला घेण्यात पावसाचा अडथळा निर्माण होऊ शकतो.
5 / 5
मोहालीबद्दल बोलायचं झाल्यास टीम इंडियाला 208 धावा करूनही पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियानं सहा विकेट गमावून चार चेंडू आधीच सामना जिंकला. नागपुरातील टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यास हैदराबाद टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करावी लागेल.