टीम इंडिया ए ने यूएई ए टीमवर 8 विकेट्सने विजय मिळवत एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केलीय. टीम इंडिया ए ने विजयासाठी मिळालेलं 176 धावांचं आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
कॅप्टन यश धूल आणि निकीन जोस हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
यश धूल आणि निकीन जोस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.
निकीन जोस याने नाबाद 41 धावा केल्या. तर यशने शानदार शतक ठोकलं.
यशने 84 बॉलमध्ये 20 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 108 धावा केल्या.