Icc World Cup 2023 आधी टीम इंडियात मोठा बदल, नक्की काय झालंय?
Team India Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप स्पर्धेला काहीच दिवस बाकी असताना बीसीसीआयने एक व्हीडिओ ट्विट केलाय. या व्हीडिओत टीम इंडियात मोठा बदल झालेला दिसतोय. पाहा नक्की काय झालंय?
1 / 6
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी जोरदार तयारी सुरु आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 7 संघाची घोषणा केलीय. तर 3 संघाची घोषणा व्हायची आहे. या दरम्यान टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
2 / 6
टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठी घोषणाही करण्यात आलीय. आयसीसी वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 8 ऑक्टोबरला टीम इंडियाचा पहिला सामना आहे. त्याआधीच टीम इंडिया नव्या लूकमध्ये दिसणार आहे. वर्ल्ड कपसाठी अदीदासने टीम इंडियाची नव्या जर्सीचं अनावरण केलंय. अदीदास टीम इंडियाची कीट स्पॉन्सर आहे.
3 / 6
बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच नव्या जर्सीतील नव्या लूकचा व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओत रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज दिसत आहेत.
4 / 6
बीसीसीआयने ट्विट केलेल्या व्हीडिओत टीम इंडियाचे खेळाडू नव्या जर्सीत दिसत आहे. आम्ही वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचं खेळाडूंनी या व्हीडिओद्वारे सांगतिलंय.
5 / 6
भारतात 2011 नंतर 12 वर्षांनी वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय. एकूण 45 दिवस 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतात वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे.
6 / 6
दरम्यान वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 5 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. हा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.