सुपर ओव्हरमध्ये सर्वात कमी धावांचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

| Updated on: Jul 31, 2024 | 2:53 PM

भारत आणि श्रीलंका टी20 मालिकेचा शेवट सुपर ओव्हरच्या थराराने संपुष्टात आला. भारताने तीन सामन्यांची मालिका 3-0 ने खिशात घातली आणि श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची दाणादाण उडाली. फक्त दोन धावाच करता आल्या आणि भारताने सहज विजय मिळवला.

1 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 2 धावा केल्या आणि विजयासाठी 3 धावा मिळाल्या. भारताने पहिल्याच चेंडूवर हे आव्हान पूर्ण केलं.

2 / 5
श्रीलंकेने फक्त 2 धावा केल्याने सर्वत्र कमी स्कोअर केल्याची चर्चा रंगली आहे. तर ते असं नाही. श्रीलंकेकडून नकोसा विक्रम मोडता मोडता राहिला. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे.

3 / 5
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 17 जानेवारी 2024 रोजी एक टी20 सामना खेळला गेला. यात दोन वेळा सुपर ओव्हर टाकण्याची वेळ आली. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 16 धावा केल्या.  भारताने बिनबाद 16 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

4 / 5
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सुपर ओव्हरमधये भारताने 2 गडी गमवून 11 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानला फक्त 1 धाव करता आली. दोन विकेट पडल्या आणि तिसऱ्या चेंडूवरच सामना संपला. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये फक्त 1 धावा करण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे

5 / 5
दरम्यान, भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या. तसेच विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेला 20 षटकात 8 गडी गमवून 137 धावा करता आल्या. एकवेळ अशी होती की श्रीलंका जिंकेल असं वाटत होतं. पण टीम इंडियाने कमबॅक केलं.  (सर्व फोटो: BCCI)