वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात, क्रीडाप्रेमींची जिंकली मनं
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून अफगाणिस्तानचा आव्हान संपुष्टात आलं आहे. स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर गेलेली पाचवी टीम आहे. पण अफगाणिस्तानचा हा प्रवास लक्षात राहण्यासारखा आहे.
1 / 7
दक्षिण अफ्रिकेला 400 हून अधिक धावांनी पराभूत करायचं होतं. पण अफगाणिस्तानचा संघ 400 धावांच्या आसपास देखील पोहोचला नाही. दुसरीकडे, अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 244 धावांचं आव्हान दक्षिण अफ्रिकेने गाठलं.
2 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अफगाणिस्तानचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत अफगाणिस्ताननं उपांत्य फेरीसाठी स्पर्धा केली. पण आता खऱ्या अर्थाने आव्हान संपुष्टात आलं आहे.
3 / 7
सामन्याच्या सुरुवाताली अफगाणिस्तानला दुबळा संघ म्हणून गणलं जात होतं. पण अफगाणिस्तान संघाने भल्याभल्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं.
4 / 7
अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला असला तरी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या दिग्गज संघांना पराभूत केलं. तसेच ऑस्ट्रेलियाशी चांगली झुंज दिली.
5 / 7
अफगाणिस्तानचं चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान पक्क केलं आहे.
6 / 7
वर्ल्डकपमध्ये इब्राहिमने अफगाणिस्तानसाठी पहिलं शतक ठोकलं. 129 धावा केल्या. रहमत शाह सलग तीनवेळा 50 प्लस धावा करणार खेळाडू ठरला. वर्ल्डकपजेत्या इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकन संघाला मात दिली. एकाही सामन्यात 300 च्या वर धावा दिल्या नाहीत. बांगलादेशनंतर दुसरी टीम भारतासमोर ऑलआऊट झाली.
7 / 7
अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इकराम अलीखिल (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी, रियाझ हसन, अब्दुल रहमान, नजीबुल्ला झद्रान